Shiv Jayanti Wishes Marathi | Shiv Jayanti Quotes in Marathi | शिवजयंती शुभेच्छा मराठी: या पोस्टमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे थोर विचार आणि त्यांची शिकवण बघणार आहोत. शिवरायांचे विचार – “कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन”. इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते. शिवराय हे फक्त नाव नव्हे तर जगण्याची प्रेरणा आणि यशाचा मंत्र आहे. जगात भारी 19 फेब्रुवारी, jagat bhari 19 februari.
यशवंत कीतिर्वंत। सार्मथ्यवंत वरदवंद।
पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।।
ह्या पोस्टमध्ये असलेले फोटोज, इमेजेस तुम्ही फ्री मध्ये डाउनलोड करून आपल्या प्रियजणांना सेंड करू शकता. आम्हाला आशा आहे कि शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. शिव जयंती निमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम.
महाराष्ट्र शासनाकडून 19 फेब्रुवारी दिवशी शिवनेरी किल्ल्यावर रीती-परंपरांनुसार शिवाजन्मोत्सव साजरा केला जातो.
जगात भारी 19 फेब्रुवारी
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।
परोपकाराचीया राशी। उदंड घडती जयाशी।
तयाचे गुण महत्त्वासी। तुळणा कैची?।।
यशवंत कीतिर्वंत। सार्मथ्यवंत वरदवंद।
पुण्यवंत नीतिवंत। जाणता राजा।।
आचारशीळ विचारशीळ। दानशीळ धर्मशीळ।
सर्वज्ञपणें सुशीळ। सकळा ठाई।।
या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता।।
कित्येक दुष्ट संहारिले। कित्येकास धाक सुटले।
कित्येकास आश्रय जाले। शिवकल्याणराजा।।
-समर्थ रामदास स्वामी
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..
मराठी पंचागानुसार फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ रोजी म्हणजे शुक्रवार १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे येथील शिवनेरी किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याची सुरुवात १८७० साली पुण्यामध्ये महात्मा जोतिबा फुलेंनी केली. शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ दरवर्षी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुका आयोजित केल्या जातात.
शिवाजी महाराज हे मराठा अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची स्थापना केली, जे त्यांच्या कारकिर्दीत भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात शक्तिशाली साम्राज्य बनले. भारताच्या इतिहासावर तसेच संस्कृतीवर शिवाजी महाराजांचा खूप मोठा प्रभाव आहे. स्वतंत्र मराठा साम्राज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी मुघलांविरुद्ध लढा दिला.
शिवाजी महाराजांच्या जयंतीला “शिव जयंती” असे म्हंटले जाते. महाराष्ट्रामध्ये शिव जयंती पारंपरिक पद्धतीने व उत्सहानें साजरी केली जाते. महाराष्ट्रात शिवजयंती निमित्त खास कार्यक्रम आयोजित केले जातात. विविध स्पर्धा आयोजित करून शिवरायांच्या कार्याला सलाम केला जातो.
शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा परंपरेनुसार साजरा केला जातो. हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकार कडून आयोजित केला जातो. या कार्यक्रमात सर्वदुरून शिवप्रेमी सहभागी होतात. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात तसेच जगभरात सुद्धा शिवप्रेमी आहेत. शिवाजी महाराज युवा वर्गाचे प्रेरणास्थान आहेत. या दिवशी पोवाडे गाऊन दिवसभर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो.
आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण लष्करी डावपेच आणि प्रशासकीय सुधारणांचा आजही अभ्यास आणि प्रशंसा केली जात आहे. त्यांच्या वारशाने असंख्य लेखक, कवी आणि कलाकारांना प्रेरणा दिली आहे आणि ते भारतीय इतिहासातील सर्वात आदरणीय आणि प्रिय व्यक्तींपैकी एक आहेत.
शिव जयंती हि एक महान नेता आणि योद्धा यांच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा उत्सव आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक साहसी व्यक्तिमत्व धैर्य, शौर्य, चातुर्य, न्याय, प्रामाणिकपणा, कल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजे म्हणून पूज्य आहेत.
शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हटले जाते. त्यांच्या नाविन्यपूर्ण लष्करी डावपेच, गनिमीकावा, प्रशासकीय सुधारणांचा, त्यांच्या रणनीती आणि राजकीय कौशल्याचा आजही अभ्यास केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला आहे. ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि अस्मिता आहेत.










शिवाजी महाराज आमचे श्रद्धास्थान असल्याचे नुसते म्हणून चालणार नाही तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालले पाहिजे. त्यांचा आदर्श, त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. लोकांनी एकत्र येण्याची आणि आपला समृद्ध असा हा सांस्कृतिक वारसा असलेल्या पवित्र पावन महाराष्टाच्या भूमीत हि शिव जयंती जल्लोषात साजरा करण्याची वेळ आहे.
धार्मिक समारंभांव्यतिरिक्त, शिवाजी जयंती सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे देखील चिन्हांकित केली जाते, ज्यात मिरवणुका, संगीत प्रदर्शने आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावर आणि कर्तृत्वावर प्रकाश टाकणारी भाषणे यांचा समावेश होतो.
शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व भारतातील आणि जगभरातील लोकांना प्रेरणा देत आहे. धैर्य, सन्मान आणि नेतृत्व यांचे प्रतीक म्हणून त्यांचा आदर केला जातो. शिवाजी महाराजांचे कर्तृत्व खूप मोठे आहे.










हिंदुस्थानातील तमाम शिव भक्तांना शिवजयंतीच्या शिवमय आणी भगव्या शुभेच्छा !
अखंड भारताचे श्रद्धास्थान, शूर, पराक्रमी, राजाधिराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय !
जय भवानी जय शिवाजी !
असा हा जाणता राजा, जगातील सर्वोत्तम योध्दा व शासक, हिंदवी स्वराज्य मराठा साम्राज्याचे संस्थापक यांना मानाचा मुजरा !
ह्या भूमंडळाचे ठाई । हिंदु धर्म राहिला काही । तुम्हां कारणे ।
।। जय शिवराय ।।
।। राजें मानाचा मुजरा ।।
अशाच inspirational messages, images and quotes साठी bestquoteslibrary.com ला भेट द्यायला विसरू नका.