Hanuman Jayanti Wishes In Marathi | हनुमान जन्मोत्सव सोहळ्याच्या शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो! Hanuman Jayanti Wishes In Marathi या पोस्टमध्ये आपण हनुमान जयंतीच्या निमित्ताने त्यांचे quotes बघणार आहोत. हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!. hanuman janmotsav 2023, hanuman janmotsav banner, hanuman janmotsav wishes, hanuman janmotsav poster. महापराक्रमी मारुती म्हणजेच हनुमान हा भक्ती, शक्ती, युक्ती, बुद्धी, सामर्थ्य तसेच भाव यांनी परिपूर्ण आहे.

हनुमान जयंती हा एक हिंदू सण आहे जो जगभरातील हिंदू चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी साजरा करतात. हिंदू धर्मातील देवतांपैकी एक असलेल्या भगवान हनुमानाचा हा जन्मोत्सव सोहळा असतो.
भगवान हनुमान हे त्यांच्या अफाट शक्ती, भक्ती आणि निष्ठा यासाठी ओळखले जातात. ते धैर्य आणि निःस्वार्थतेचे प्रतीक मानले जातात. हनुमान जयंती हि सहसा मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये येते.

Hanuman-janmotsav -Wishes-In-Marathi
Hanuman-janmotsav -Wishes-In-Marathi

Hanuman Janmotsav Wishes In Marathi

भारतातील अनेक भागांमध्ये हनुमान जयंती म्हणजे एक भव्य सोहळा असतो. या दिवशी श्री हनुमानाचे भक्त सकाळी हनुमान मंदिरात जातात त्यांची पूजा, अर्चना करतात. हार, फुले, फळे, मिठाई असा नेवेद्य त्यांना अर्पण करतात. मारुतीला प्रसाद म्हणून गूळ व चणे अर्पित करावे. त्यानंतर त्याच्या चरणातील शेंदूर आपल्या कपाळी लावावे. मारुतीचे दुसरे सर्वपरिचित नाव आहे हनुमान.

हनुमान जन्मोत्सव सोहळा

हनुमंताला रुई, तेल आणि शेंदूर या तीन गोष्टी वाहतात व त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना करतात. हनुमान जयंतीच्या दिवशी ठिकठिकाणी हनुमान मंदिर ट्रस्टद्वारे मंदिरात तेथील नागरिकांसाठी अन्नदान भंडारा आयोजित केला जातो. जेथे जात, पंथ किंवा धर्माची पर्वा न करता सर्वांना मोफत अन्न वाटप केले जाते.

hanuman janmotsav 2023
hanuman janmotsav 2023
hanuman janmotsav banner
hanuman janmotsav banner
hanuman janmotsav images
hanuman janmotsav images
hanuman janmotsav ki hardik shubhkamnaye
hanuman janmotsav ki hardik shubhkamnaye
hanuman janmotsav quotes
hanuman janmotsav quotes

तुम्हाला हेहि वाचायला आवडेल: Mahashivratri Marathi Shubhechha Sandesh | महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

हनुमान जयंती उत्सवातील सर्वात महत्वाच्या पैलूंपैकी एक म्हणजे हनुमान चाळीसाचे पठण हे होय. जे भगवान हनुमानाचे स्तोत्र आहे. हनुमान चाळीसा (चालीसा) ही १६व्या शतकातील कवी तुलसीदास यांनी रचली होती असे मानले जाते. हनुमान चाळीसा हि हिंदू धर्मातील सर्वात शक्तिशाली प्रार्थनांपैकी एक मानली जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी भगवान हनुमानाचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भक्त हनुमान चालिसाचे अनेक वेळा पठण करतात. त्याने जीवन निरोगी,समृद्ध व संपन्न होते अशी त्याची धारणा आहे.
“नासै रोग हरै सब पीरा। जपत निरन्तर हनुमत बीरा ।।”

hanuman janmotsav whatsapp status
hanuman janmotsav whatsapp status
hanuman janmotsav wishes in Marathi
hanuman janmotsav wishes in Marathi
hanuman janmotsav
hanuman janmotsav
hanuman janmotsavchya shubhecha
hanuman janmotsavchya shubhecha
Hanuman Jayanti Wishes In Marathi
Hanuman Jayanti Wishes In Marathi

हनुमान जयंती हा भगवान हनुमानाच्या सद्गुणांचा उत्सव आणि भक्ती, विश्वास आणि निस्वार्थीपणाच्या शक्तीची आठवण करून देणारा उत्सव आहे. हिंदूंनी एकत्र येण्याची आणि भगवान हनुमानाचे आशीर्वाद घेण्याची आणि त्यांच्या शिकवणींवर आणि त्यांनी आम्हाला शिकवलेल्या धड्यांवर चिंतन करण्याची ही वेळ आहे. हनुमान जयंती हा केवळ धार्मिक सण नसून मानवी आत्म्याचा आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचा उत्सव आहे.

तुम्हा सर्वाना हनुमान जन्मोत्सव सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

आम्हाला आशा आहे की तुम्हाला “Hanuman Janmotsav Wishes In Marathi | हनुमान जयंती शुभेच्छा” ही पोस्ट आवडली असेल. ही पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आमच्या खाली लिंक दिलेल्या इतर पोस्ट देखील वाचू शकता.

हनुमान जयंती यावर्षी कधी आहे?

यावर्षी हनुमान जयंती 6 एप्रिल 2023 वार गुरुवार या दिवशी आहे.

हनुमानास कोणकोणत्या नावांनी ओळखले जाते?

हनुमानास मारुती, बजरंगबली, अंजनीपुत्र, महारुद्र, रामदूत, पवनपुत्र, संकटमोचन, केसरीनंदन, रामभक्त, वायुपुत्र या विविध नावांनी ओळखले जाते.

हनुमान जयंती वर्षातून किती वेळा येते?

हनुमान जयंती वर्षातून दोन वेळा साजरी केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र शुक्ल पौर्णिमेला म्हणजे ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार मार्च किंवा एप्रिल या महिन्या दरम्यान एकदा आणि कार्तिक कृष्ण चतुर्दशीला म्हणजे नरक चतुर्दशीला सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्या दरम्यान दुसऱ्यांदा साजरी केली जाते.

हनुमानाचा जन्मदिवस कधी साजरा केला जातो?

हनुमान जन्मोत्सव हा हिंदू सण आहे. चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी हनुमानाचा जन्म झाला. ते चिरंजीवी आहेत. त्रेतायुगापासून ते जीवित आहेत आणि या कलयुगात सुद्धा ते पृथ्वीवर श्री रामाचे नामस्मरण करत भ्रमण करीत आहेत.

हनुमान जयंती का साजरी केली जाते?

हनुमान जन्मोत्सव हा एक हिंदू सण आहे. या दिवशी रामभक्त हनुमान यांचा जन्म झाला होता म्हणून हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा या दिवशी भारतभर साजरा केला जातो.

हनुमान जयंती आणि जन्मोत्सव यात काय फरक आहे?

तसे पाहता, जयंती आणि जन्मोत्सव हे शब्द फक्त वाढदिवस साजरा करण्यासाठी आहेत. पण जयंती हा शब्द अश्या व्यक्तीसाठी वापरला जातो, जी व्यक्ती आता हयात नाही पण त्या व्यक्तीच कर्तृत्व मोठं होतं. जन्मोत्सव हा शब्द अश्या व्यक्तीसाठी वापरला जातो जी व्यक्ती हयात आहे.

हनुमान जयंती वर्षातून दोनदा का येते?

हनुमान जयंती हा भगवान हनुमान यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा सन्मान करण्याचा शुभ दिवस आहे. वर्षातून दोनदा हा दिवस साजरा केला जातो. एक जयंती भगवान हनुमानाच्या जन्माचे स्मरण करते, तर दुसरी हनुमान विजयम (हनुमानाचा विजय) स्मरण करते.

हनुमान कोणाचा अवतार आहेत?

हनुमानाला भगवान शंकराचा रुद्र अवतार मानले गेले आहे. हनुमान हे शंकराच्या 11 रुद्र अवतारांपैकी एक होते.

हनुमानाला हनुमान का म्हणतात?

जेंव्हा हनुमान सूर्याला फळ समजून त्याला घ्यायला आकाशात उडाले तेंव्हा इंद्रदेवाने हनुमानाच्या दिशेने वज्र फेकले ते हनुमानाच्या हनुवटीला लागले आणि त्याची हनुवटी छाटली गेली म्हणुन तेव्हापासून त्यांना हनुमान हे नाव पडले.

हनुमान आता कुठे आहेत?

भगवान राम पृथ्वीवरील अवतार संपल्यावर शरयू नदीतून स्वर्गात परत जातात. भगवान हनुमान आजही येथे पृथ्वीवर आहेत आणि ते कलयुगाच्या अंतापर्यंत पृथ्वीवरच असतील ते चिरंजीवी आहेत. त्रेतायुगापासून ते जीवित आहेत आणि या कलयुगात सुद्धा ते पृथ्वीवर श्री रामाचे नामस्मरण करत भ्रमण करीत आहेत.

हनुमानाचा कोणता फोटो घरात ठेवावा?

दक्षिणाभिमुख हनुमान. वास्तूनुसार हनुमानाचे दक्षिणाभिमुख चित्र अधिक शुभ असते कारण हनुमानजींनी आपला प्रभाव याच दिशेला सर्वाधिक दाखवला आहे.

हनुमानाची आवडती राशी कोणती?

ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशी हनुमानाची आवडती राशी आहे.

हनुमानाची कोणती मूर्ती घरासाठी चांगली आहे?

पंचमुखी हनुमान. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो असावा. त्यांचे तोंड हे नैऋत्य दिशेला असावे त्यामुळे त्या घरातील प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतात. धनात वृद्धी होते.

तुम्हाला हेहि वाचायला आवडेल: Ram Navami Wishes – राम नवमीच्या शुभेच्छा